Bhosari News :वेश्या व्यवसाय चालणा-या तीन लॉजवर भोसरी पोलिसांचा छापा

आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी मंगळवारी (दि. 8) वेश्या व्यवसाय करणा-या तीन लॉजवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी काही तरुणींची सुटका केली असून आठ जणांना अटक केली आहे.

धावडे वस्ती भोसरी येथे भोसरी पोलिसांनी पहिली कारवाई केली. येथील साईराज लॉजवर छापा टाकून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्रशांत राजीव शेट्टी (वय 45), चेतन राजू पुजारी (वय 32), प्रशांत मेलगिरी (तिघे रा. धावडे वस्ती, भोसरी), प्रकाश शेट्टी (रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील प्रशांत आणि चेतन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रकाश शेट्टी याचा हा लॉज असून तो अन्य तीन आरोपींकडून लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करून घेत होता.

भोसरी पोलिसांनी दुसरी कारवाई शास्त्री चौकातील सूर्या हॉटेल अँड लॉज येथे केली. यात पोलिसांनी प्रशांत मुरलीधर फाळके (वय 40, रा. भोसरी, मूळ रा. बुलढाणा), ज्ञानेश्वर श्रीराम फाळके (वय 43, रा. भोसरी, मूळ रा. बुलढाणा), परमेश्वर रावसाहेब इंगळे (वय 43, रा. भोसरी, मूळ रा. लातूर) या तिघांना अटक केली आहे. हे आरोपी सूर्या हॉटेल बार अँड लॉज (सन लॉज अँड म्युझिक अँड डिस्को लाईट हॉल) येथे वेश्या व्यवसायासाठी ग्राहक आणून तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते.

तिसरी कारवाई शास्त्री चौकातील वनराज हॉटेल बार रेस्टोरंट व लॉजिंग येथे केली. यात पोलिसांनी विश्वनाथ भोजा शेट्टी (वय 56, रा. भोसरी), सीताराम रामण्णा शेट्टी (वय 50, रा. पिंपरीगाव), कुबेर फकीरप्पा पात्रोट (वय 48, रा. भोसरी) या तिघांना अटक केली. तिन्ही आरोपी महिलांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते.

लॉजिंग व हॉटेल मालक यांना त्यांच्या हॉटेल व लॉजमध्ये येणा-या ग्राहकांची माहिती एका रजिस्टरमध्ये नोंद करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून संबंधित हॉटेल मालकांना नोटीस देखील देण्यात आली होती. मात्र, कारवाई केलेल्या हॉटेल मालकांनी अशा प्रकारचे रजिस्टर न ठेवता आदेशाचा भंग केला असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.