Wakad Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. यात चार महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) दुपारी कस्पटे वस्ती, वाकड येथे केली.

स्पा सेंटर मालक महिला आणि मॅनेजर रनवीर रामनरेश राठोड (वय 31, रा. च-होली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती, वाकड येथे ‘ट्रॅको ट्रीट स्पा’ नावाचे स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये आरोपींनी चार महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त करून त्यांच्याकडून पैशांचे अमिष दाखवून आरोपी वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चार महिलांची सुटका करून दोघांवर गुन्हा दाखल केला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळ, डॉ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, संगीता जाधव, अनिल महाजन, जालिंदर गारे, राजेश कोकाटे, सोनाली माने, योगेश तिडके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.