Hinjawadi Crime News : हिंजवडी मधील H2O हॉटेलवर पोलिसांची कारवाई; हुक्का साहित्य जप्त

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातील H2O नावाच्या हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी हुक्का पिण्याचे साहित्य, हुक्का फ्लेवर जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 28) रात्री पावणे दहा वाजता करण्यात आली.

पोलीस शिपाई अमित जगताप यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जुनेद असगर अली अन्सारी (वय 37, रा. मिठानगर कोंढवा, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणनगर हिंजवडी येथे H2O नावाच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात सहा हजारांचे चार हुक्का पॉट, चार हुक्का पाईप तसेच सहा हजार 170 रुपयांचे चार हुक्का फ्लेवर बॉक्स असा एकूण 12 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हिंजवडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.