Chinchwad Crime News : अजंठानगर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – अजंठानगर, चिंचवड येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 13) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

गुरुदास जगन्नाथ गायकवाड (पस 34, रा. ओटास्कीम, निगडी), कन्हैय्या राजेश्‍वर चौधरी (वय 28, रा. रामनगर, चिंचवड), कल्याणसिंग भिमसिंग राजपूत (वय 62, रा. ओटास्कीम, निगडी), दीपक पोपट कांबळे (वय 34), भीमराव व्यंकटेश पाटील (वय 34), सिद्धनाथ काशिनाथ जाधव (वय 41, फरीद इस्माइल शेख (वय 33, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई उमेश मोहिते यांनी सोमवारी (दि. 13) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजंठानगर, चिंचवड येथे ‘रम्मी जुगार अड्डा’ सुरू असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास छापा घालून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन व रोख सात हजार 940 असा एकूण 30 हजार 20 रुपयांचा ऐवज जप्त केला असून या प्रकरणी निगडी पोलीस आणखी तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.