Pune : बुधवार पेठेत पोलिसांचा छापा ; 2 बांगलादेशी मुलींची सुटका

एमपीसी न्यूज- बुधवार पेठेतील वेश्याव्यवसाय करून घेतला जाणा-या न्यू सागर बिल्डिंग येथे छापा टाकून 2 बांगलादेशी मुलींची पोलिसांकडून सुटका करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाला काल (दि. 28) क्रांती हॉटेल चौका जवळील न्यू सागर बिल्डिंगमधील तळमजल्याच्या खोलीत राज्यातील व परदेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो, अशी माहिती मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ पडताळणी करून छापा टाकून 2
बांगला देशी सज्ञान पीडित मुलींची सुटका केली.

याप्रकरणी फसारखाना पोलीस स्टेशन येथे एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फसरखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.