Nigdi News : पोलीस रेझिंग डे निमित्त दिशा उपक्रमाअंतर्गत झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरव

एमपीसी न्यूज पोलीस रेझिंग डे निमीत्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने निगडी पोलीस स्टेशन येथे दिशा या सामाजिक उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.6) झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरव करण्यात आला.  

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “दिशा” या उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाणेहद्दीमध्ये बस्ती / झोपडपट्टी भागामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला/गृहिणी समिती, बालकल्याण सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते प्रतिनिधी, पोलीस ठाणे स्तरावर नेमण्यात आलेले समन्वयक पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत दिशा भरकटलेल्या बालकांचा व सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास 200 हुन अधिक महिला व सामाजिक कार्यकर्ते समन्वयक व पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शाळाबाहय मुले व व्यसनाधीन मुलांनी दिशा उपक्रम सुरु केल्यामुळे कसा सकारात्मक बदल झाला आहे याबाबत आपला अनुभव व्यक्त केला. यावेळी बोलताना पोलीस उप-आयुक्त परिमंडल-02 काकासाहेब डोळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड यांनी उपस्थित सर्व महिला,गृहिणी समिती, सामाजिक कार्यकर्ते (Nigdi News) यांचे दिशा उपक्रमामध्ये सहभागी झालेबददल अभिनंदन केले. महिला,गृहिणी समिती व समन्वयकांच्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेले बालक तसचे शाळाबाह्य बालकांना गुन्हेगारी मार्गावर जाण्यापासून परावृत्त करुन त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दलाकडुन आणखी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Moshi toll naka : मोशीतील टोल वसुली तात्काळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन…

दिशा उपक्रम अंतर्गत संपुर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हददीमध्ये घेतलेले एकुण कार्यक्रम 74 घेण्यात आले. तसेच शाळाबाहय बालकासाठी समुपदेशन करण्यात आलेल्या बालकांची संख्या 345 असुन व्यसनमुक्ति केंद्रात दाखल केलेल्या बालकांची संख्या- 02 व्यसनमुक्ति संदर्भात समुपदेशन करण्यात आलेल्या बालकांची एकूण संख्या 214, दिशा उपक्रम संदर्भात राबविलेले इतर उपक्रम 25 तसेच एकूण 14 शाळाबाहय बालकांना कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसताना जिल्हा परिषद शाळेत अँडमिशन करुन दिले. (रावेत-7, तळेगाव 5. भोसरी एमआयडीसी 2), भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत बालाजीनगर झोपडपटटी येथे विदयार्थ्यांसाठी वाचनालय सुरु केले.

त्यासाठी लागणारे कपाट, पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. दिशा उपक्रम अंतर्गत एकूण 12 शाळाबाहय मुलांना “तेरे देस होमस” या सामाजिक संस्थेच्या मदतीने कोहीनुर इन्स्टीटूट काळमोर नगर येथे मोफत मोबाईल रिपेअरिंग कोर्स उपलब्ध करुन सुरु देण्यात आलेला आहे. दिशा उपक्रम अंतर्गत चांगली कामगिरी करणारे रावेत, भोसरी एमआयडीसी, तळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी अंमलदार, समन्वयक यांचादेखील गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आभार पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 काकासाहेब डोळे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन निगडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे,(Nigdi News) पोलीस निरीक्षक, गुन्हे देवेंद्र चव्हाण, विशेष बाल पथकाचे संपत निकम (श्रेणी पोलीस उप-निरीक्षक), दिपाली शिर्के, अमोल मुठे, भूषण लोहरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.