Police Recruitment : राज्यात 12,538 पोलीस शिपाई भरती ; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

एमपीसी न्यूज- राज्य शासनाने पोलीस दलात शिपाई संवर्गातील 12 हजार 538 पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार 297 पदांची भरती केली जाईल. याची प्रक्रियाही सुरू झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला व त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध केली होती. मात्र, एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबवली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 5 हजार 297 पदांची भरती केली जाणार आहे. तसेच त्यानंतर लवकरच भरतीचा दुसरा टप्पाही पूर्ण केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

12 हजार 538 पदाव्यतिरिक्त आणखी पदांची गरज भासल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून भरतीचा निर्णय घेतला जाईल. सध्या मात्र पहिल्या 5 हजार 297 पदांची भरती केली जाईल. या भरती बाबत प्रक्रिया देखील सुरू झाल्याचे गृहमंत्री यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.