Pune : सराईत गुन्हेगाराकडून 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराकडून वानवडी पोलिसांनी 38 मोबाईल व दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

अजय रणछोड उर्फ राजू खरे (वय 20 रा. काळेपडळ, हडपसर, पुणे, मु. गंगापूर औरंगाबाद), असे या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिसांना 23 जुलै रोजी त्यांच्या बातमीदारामार्फत आरोपी हा कंजारभाट वस्तीकडे ग्रे रंगाची पलसर 220 मोटारसायकल असून ती चोरीची असल्याचा संशय आहे, अशी माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी गस्त घालून बातमीची खात्री केली. तिथे बजाज पल्सरसह एक इसम मिळून आला. त्याचे नाव विचारले असता त्याने अजय रणछोड उर्फ राजू खरे असे सांगितले.

त्याची चौकशी केली असता ही मोटारसायकल जे. एस. पी. एम कॉलेजच्या मागून त्याच्या साथीदारासह मिळून चोरी केल्याचे कबूल केले. त्याला ताब्यात घेऊन माहिती घेतली असता मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करून त्याच्याजवळ अधिक तपास केला असता त्याच्याकडून चोरीचे 38 मोबाईल व दोन मोटारसायकल असा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1