Pune: ‘कोरोनाशी लढताना पोलिसांनीही आरोग्याची काळजी घ्यावी’

'Police should take care of health while fighting corona'

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे भयंकर संकट असतानाही पोलीस बांधव आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून वारजे पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस यांना एकूण 150 फेसशील्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष डॉ. अजित सिंह पाटील, डॉ. संगीता खेनट, डॉ. हरिभाऊ सोनावणे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. भालचंद्र कदम,  विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, डाॅ नरेंद्र खेनट, राजीव पाटील, निव्रुत्ती येनपुरे, सुरेश जाधव उपस्थित होते.

वारजे – माळवाडी – कर्वेनगर हा भाग कोरोनामुक्त ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबरच पोलीस रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल झाल्याचा अनुभव मिळत आहे. या भागातील दुकानेही सुरू आहेत. त्यामुळे काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

कोरोनाचे संकट ओळखून सोशल डिस्टनसिंगचे नियम पळून, मास्क लावणे सॅनिटायजरचा वापर करणे नागरिकांनी आवश्यक आहे, असे दीपाली धुमाळ यांनी सांगितले. या भागातील नागरिकांचेही आरोग्य चांगले राहावे, यासाठी नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली होती. प्रशासन देत असलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे, शक्यतो घरातच राहावे, विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन बाबा धुमाळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.