Lonavala : लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज – लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

निलेश भागवत (वय 27, रा. मुंबई) असे या प्राण व‍ाचलेल्या पर्यटकाचे नाव आहे.

निलेश हा काही मित्रांच्या समवेत वर्षाविहाराला लोणावळ्यात आला होता. लायन्स पॉईंट परिसरात मद्य प्राशन करून फिरताना त्याचा पाय घसरल्याने तो दरीत पडला. साधारण शंभर फूट अंतरावर तो एका झाडाला आडकला होता. त्याचे मित्रांनी देखील मद्य प्राशन केलेले असल्याने कोणीही त्याला वाचविण्याकरिता पुढे येत नव्हते.

हा प्रकार स्थानिकांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस काँन्स्टेबल भूषण कुवर, मयुर अबनावे, हनुमंत शिंदे, वाँर्डन योगेश हांडे, शुभम कराळे, गणेश गाडे यांनी दोरच्या सहाय्याने कुवर यांना खाली उतरवत निलेशला बाहेर काढले. काल याच ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गिधाड तलाव धबधब्यात पडून पुण्यातील एका युवकाचा दुदैवी अंत झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.