Chinchwad : शहरात 71 जणांवर पोलिसांकडून कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीतून बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र कोरोनाची साथ अजूनही संपली नसल्याने खबरदारीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. रविवारी (दि. 8) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 71 नागरिकांवर कारवाई केली आहे.

कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. रविवारी शहरात 123 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही आकडेवारी मागील काही आठवड्यांपूर्वी 800 ते 1000 एवढी होती. कोरोना बाधित नागरिकांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना साथ पूर्णपणे संपलेली नाही. जरासा हलगर्जीपणा कोरोनाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून थेट भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले जात आहेत. शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या 71 नागरिकांवर खटले दाखल केले आहेत.

एमआयडीसी भोसरी (4), भोसरी (4), पिंपरी (8), चिंचवड (1), निगडी (5), आळंदी (0), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (16), वाकड (16), हिंजवडी (14), देहूरोड (3), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.