Pune News : पोलिसांनो, डुग्गुचे अपहरणकर्ते कोठे आहेत? 

एमपीसी न्यूज : पुण्याच्या बाणेर परिसरातून अपहरण झालेला डुग्गु उर्फ स्वर्णव सतीश चव्हाण सुखरूप सापडला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. अपहरणकर्त्यांनीच त्याला सोडून पळ काढला आहे. मात्र अपहरणकर्त्याचा शोध अद्यापही लागला नाही. पुणे पोलीस पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने. यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील काही भागात पोलिसांनी छापेही टाकले आहेत. पण पथकाच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अजूनही पोलिसांना डुग्गुचे अपहरणकर्ते कोण आहेत हे शोधण्यात अपयश आले. 

अपहरण झाल्यानंतर नऊ दिवसांनी डुग्गुला आरोपीने सोडून दिले होते. डुग्गु सुखरूप सापडल्यानंतर पोलिसांना दिलासा मिळाला असला तरी आरोपींना शोधण्याचं आव्हान अजूनही पोलिसांसमोर आहे. डुग्गुला पुनावळे परिसरात सोडून आरोपीने पळ काढल्यानंतर पुणे पोलीस त्या परिसरात आरोपीचा शोध घेत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विविध ठिकाणी छापेमारी करत आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अपहरणकर्ता मात्र अजूनही सापडला नाही.

अपहरणकर्त्यांनी दुग्गुला पळवून नेताना काळे जॅकेट, डोक्याला हेल्मेट, पाठीला सॅक अडकवली होती. डुग्गुला सोडतानाही त्याने काळे जॅकेट घातले होते. संपूर्ण चेहरा झाकला होता. चेहर्‍याचा मास्क लावल्यामुळे त्याचे फक्त डोळे दिसत होते. दुग्गुला सोडताना तो त्याला चालत घेऊन आला होता. जाताना ही तो चालतच गेला. काहीच सीसीटीव्हीमध्ये तो कैद देखील झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.