Pune Crime News : दुचाकी घसरून महिला पोलिसाचा पती ठार

Policeman's husband killed after falling off two-wheeler

एमपीसीन्यूज : दुचाकी चालविताना घसरून पडल्याने महिला पोलीस शिपाईचा पती ठार झाल्याची घटना काल (रविवारी ) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील कचरा डेपोसमारे घडली.

विजय केरबा कवठेकर (वय 44, रा. पोलीस वसाहत विश्रांतवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक ए. ए. मोटे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय एका खासगी कंपनीत कामाला होते. त्यांच्या पत्नी पोलीस दलात कार्यरत असून ते कुटुंबियांसह विश्रांतवाडी पोलीस लाईनमध्ये राहायला आहेत.

काल (रविवारी ) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विजय दुचाकीवर पुणे-आळंदी सर्व्हिस रस्त्याने पोलीस लाईनकडे चालले होते. त्यावेळी त्यांच्याकडीत दुचाकी रस्त्यावर घसरून खाली पडली. त्यामुळे खाली पडल्याने विजय गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश अणेचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.