Polio vaccination campaign : देशभरात आजपासून सुरु झाले पोलिओ लसीकरण अभियान

एमपीसी न्यूज: दरवर्षी 31 जानेवारी हा दिवस ‘पल्स पोलिओ लसीकरण दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. आज या दिवसापासून भारताची पोलिओ लसीकरण मोहीम चालू झाली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे.

आजपासून सुरू झालेली ही पोलिओ लसीकरणाची मोहीम पुढील तीन दिवस चालू राहणार आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली आहे. भारत हा पोलिओमुक्त देश झाल्याचे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने 2014 सालीच भारताला दिलं आहे. परंतु अजूनही भारतात पोलिओ लसीकरणाचे अभियान राबवण्यात येते. पोलिओची लस ही पाच वर्षांच्या आतील बालकांना देण्यात येत असून ती मोफत आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील एम. आय. डी. सी परिसरातील शासकीय रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यात होणा-या पल्स पोलिओ मोहीमेत सुमारे 11 लाख 32 हजार 351 बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे असल्याचे सांगून त्यानुसार आज जिल्ह्यात 6 हजार 700 बुथवर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच 6 हजार 254 पथकांच्या मदतीने गृहभेटी देऊन ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.