_MPC_DIR_MPU_III

Politics in Bollywood – फिल्मइंडस्ट्रीत घाणेरडे राजकारण खेळले जाते असा ‘या’ अभिनेत्रीचा आरोप

The 'This' actress alleges that dirty politics is being played in the film industry

एमपीसीन्यूज : सुशांतसिंह राजपूत या तरुण पिढीतील गुणवान अभिनेत्याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा हा धक्कादायक अंत अनेकांना सुन्न करुन गेला. हसताखेळता गुणी अभिनेता असा अचानक तरुणपणीच आपल्या जीवाला संपवतो हे पटणारे नाही असेदेखील म्हटले गेले.

_MPC_DIR_MPU_IV

यानंतर काल कंगना रानावतने चित्रपटसृष्टीमधील कंपूशाहीबद्दल प्रचंड टीका केली. आता अभिनेत्री रविना टंडनने ट्विट करत इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. माझंही करिअर उध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले, असं तिने ट्विटरवर म्हटलंय.

‘तुम्हाला चित्रपटांमधून काढून टाकलं जातं. हिरो त्याच्या गर्लफ्रेंडला चित्रपटात आणतो किंवा काही मित्रांच्या मदतीने चुकीच्या बातम्या पसरवून दुसऱ्यांचं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जातो.

_MPC_DIR_MPU_II

तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो. काही लोक ते सहन करू शकतात तर काही नाही’,असे आरोप तिने केले आहेत.

पुढे तिने लिहिलं, ‘तुम्ही जर याविरोधात आवाज उठवला तर तुम्हाला ढोंगी म्हटलं जातं, वेडं समजलं जातं. हे या इंडस्ट्रीचं सत्य आहे. हे कोणासोबतही होऊ शकतं.

माझ्यावर जितका दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, तितक्याच ताकदीने मी लढा दिला. घाणेरडं राजकारण सर्वत्र होतं. मला या इंडस्ट्रीबद्दल प्रेम आहे, पण इथे तणावसुद्धा खूप आहे. काही लोक चांगले आहेत तर काही राजकारण करणारेसुद्धा आहेत. हे जग असंच आहे.’

चित्रपटसृष्टीची काळी बाजू असे याला म्हणता येईल. येथे विशिष्ट ग्रुपमधील लोकांनाच पुढे येण्यास वाव मिळतो. दुस-या टॅलेन्टेड लोकांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले जाते, त्यांना भूमिका मिळत नाहीत. अशी चर्चादेखील या निमित्ताने सुरु झाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाही गॉडफादर नसलेल्या कलाकारांना टिकू देत नाही अशी चर्चा आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.