Pune / Baramati : दुपारी एक वाजेपर्यंत पुण्यात 22.58 टक्के मतदान (व्हिडिओ)

गिरीश बापट, मोहन जोशी, सुप्रिया सुळे, कांचन कुल यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

एमपीसी न्यूज- देशभरात यंदा सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 14 जागांसह देशातील 115 जागांवर आज मतदान होत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत  पुण्यात पुण्यात 22.58 मतदान झाले. पुण्यात महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी तर बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल या लढतींकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पुण्यात सकाळपासून शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत 156 नंबर मनपा शाळेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही वेळ मतदान थांबवण्यात आले होते.

सॅलिसबरी पार्क मधील एका मतदान केंद्रावर रांगोळी रेखाटन मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत. पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज सकाळी पत्नी व कुटुंबियांसह सॅलीसबरी पार्क येथील ह्युम मॅकहेंरी स्कुलमध्ये मतदान केले. त्यांच्या समर्थकांसह नागरिकांनी त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये गिरीश बापट यांनी सहकुटुंब मतदान केले. दरम्यान, भाजपकडून रात्रीपासून मुक्तपणे गुंडांचा आणि पैशाचा वापर सुरू केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला. त्यावर बापट यांनी मोहन जोशी यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत..काँग्रेसचे उमेदवार अदखलपात्र आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. चारही मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी होतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आई प्रतिभा पवार तसेच कांचन कुल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यामध्ये पुणे, बारामतीसह माढा, सातारा, सांगली ,कोल्हापूर, हातकणंगले, नगर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव, रावेर, औरंगाबाद व जालना इथं मतदान होत आहे. यासोबतच गुजरात व केरळच्या सर्व जागा तसेच कर्नाटकच्या उर्वरीत मतदारसंघांचा समावेश आहे.

भोईरवाडी माण येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, माण भोईरवाडी येथील 350 मतदारांची नावे हिंजवडी शाळेत गेल्याने मतदारांना मनस्ताप सोसावा लागला.

आईचा दशक्रियाविधी करण्यापूर्वी, त्या दोघांनी केले मतदान

देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असून यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. तर पुण्यात तिसर्‍या टप्प्यात आज सकाळपासून पुण्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. यंदा नागरिकांमध्ये मतदान करताना प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत असून याच दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघातील अहिल्यादेवी शाळेत सरपोतदार भावंडानी आईचा दशक्रिया विधी करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.

या बाबत विवेक सरपोतदार म्हणाले की, माझ्या आईचे 14 तारखेला निधन झाले. त्यानंतर आज पुणे शहरात मतदान होत असून आजच दशक्रिया विधी असल्याने मतदान असल्याने प्रथम मतदान करावे. त्यानंतर दशक्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही ज्या प्रकारे मतदान केले. हे लक्षात घेता प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

विवाहापूर्वी नववधूने बजावला मतदानाचा हक्क

भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. नूमवी प्रशाला येथे नवरी श्रध्दा भगत हिने आपला मतदानाचा हक्क बजावला.

shraddha Bhagat

हौसबाई साठे 90 वर्ष आजीने तर मुलगा चंद्रकांत वय 65 यांनी केले मतदान

भोईरवाडी, माण मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.