Facebook : फेसबुकचे लोकप्रिय फिचर 1 ऑक्टोबरपासून बंद

एमपीसी न्यूज – फेसबुकने त्यांचे लोकप्रिय फीचर बंद करण्याची घोषणा केली असून येत्या 1 ऑक्टोबर पासून युजर्सना त्याचा वापर करता येणार नाही. फेसबुकने 1 ऑक्टोबरपासून (Facebook) त्यांचे लाइव्ह शॉपिंग फिचर बंद करण्याची घोषणा केली असून इन्स्ट्राग्रामवरील व्हिडीओ प्लॅटफार्मवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

 

फेसबुकच्या या घोषणेनंतर युजर्स थेट कार्यक्रम प्रसारीत करण्यासाठी फेसबुक लाईव्ह वापरण्यास सक्षम असतील. परंतु ते त्यांच्या फेसबुक लाइव्ह व्हिडीओमध्ये उत्पादन प्लेलिस्ट किंवा उत्पादने टॅग करु शकणार नाही. फेसबुकचे लाईव्ह शॉपिंग फिचर क्रिएटर्सला उत्पादनांचे जाहिरात आणि त्यांची विक्री करण्यास अनुमती देते. लाइव्ह फिचरला पहिल्यांदा थायलंडमध्ये 2018 मध्ये रोल आउट करण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.