Pune News : डॉक्टर तरुणीचे फेक इंस्टाग्राम अकाउंट तयार करून अश्लील मेसेज
एमपीसी न्यूज : एका 27 वर्षीय डॉक्टर तरुणीचे फेक इंस्टाग्राम अकाउंट तयार करू त्यावर अश्लील मेसेज आणि फोन करून अश्लील संवाद करणाऱ्या तीन मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादी नंतर अलंकार पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी या डॉक्टर आहेत. अज्ञात आरोपीने त्यांच्या संमतीशिवाय संगणकाचा वापर करून फेक इंस्टाग्राम प्रोफाइल तयार केले. यावर फिर्यादीचा मोबाईल नंबर देखील टाकण्यात आला होता. या मोबाईल नंबर वर अनोळखी लोकांकडून वारंवार फोन येत होते. तिच्याशी अश्लिल संभाषण करीत अश्लील मेसेज देखील पाठवले जात होते.
याप्रकरणी तक्रार आल्यानंतर अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन मोबाइल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अलंकार पोलिस करत आहे.