Pune News : येरवड्यात अल्पवयीन मुलाकडून 5 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे

गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बेकरी मध्ये पाव आणण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत 17 वर्षीय मुलाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघड झाला आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर मध्ये हा प्रकार घडला.

पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दिली असून 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी विरुद्ध येरवडा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात राहतात. तर आरोपी देखील त्याच परिसरात राहतो. फिर्यादी यांची पाच वर्षाची मुलगी रविवारी रात्री पाव आणण्यासाठी घराजवळच असणाऱ्या बेकरीमध्ये गेली होती. यावेळी सतरा वर्षे आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.