Positive News : राज्यात मागील 6 दिवसात 4.42 लाख रुग्ण कोरोनामुक्त ; राजेश टोपे यांची माहिती

0

एमपीसी न्यूज : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मागील सहा दिवसात राज्यभरात 6 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सोमवारी 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान 60 हजारांच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी 18 एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक 68 हजार 631 इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नवीन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

20 एप्रिल – 54,224 रुग्ण कोरोनामुक्त
21 एप्रिल – 54, 985 रुग्ण कोरोनामुक्त
22 एप्रिल – 62,298 रुग्ण कोरोनामुक्त
23 एप्रिल – 74,045 रुग्ण कोरोनामुक्त
24 एप्रिल – 63,818 रुग्ण कोरोनामुक्त
25 एप्रिल – 61,450 रुग्ण कोरोनामुक्त
26 एप्रिल – 71,736 रुग्ण कोरोनामुक्त

असे एकूण सहा दिवसांत 4 लाख 42 हजार 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment