PMRDA : पेठ क्रमांक 12 गृहप्रकल्पातील सदनिकांची ताबा प्रक्रीया सुरु; पहिल्याच दिवशी 234 सदनिकांचे ताबे पूर्ण

एमपीसी न्यूज – ​पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत (PMRDA)  पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पातील  कमी उत्पन्न गट (एलआयजी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील (ईड्ब्ल्यूएस) सदनिकांची ऑनलाईन लॉटरी पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेचे सर्व हप्ते अदा केले आहेत, अशा लाभार्थ्यांसमवेत आर्टीकल ऑफ अॅग्रीमेंट दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना इमारतनिहाय सदनिकेचा ताबा देण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी 234 सदनिकांचे ताबे पूर्ण झाले.

Moshi : कर्जाचा हप्ता न भरल्याने फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने केला महिलेचा विनयभंग

पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पात एकूण 52 हेक्‍टर क्षेत्रापैकी 9.43 हेक्‍टर क्षेत्रावर हा गृहप्रकल्प साकारला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 4 हजार 883 सदनिका उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) 3 हजार 317 तर, अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) 1 हजार 566 सदनिका उभारल्या जात आहे. ईडब्ल्यूएस सदनिकांचे कार्पेट क्षेत्र प्रत्येकी 317.50 चौरस फूट इतके आहे. तर, 2 बीएचके सदनिकांचे कार्पेट क्षेत्र प्रत्येकी 637.81 चौरस फूट इतके आहे. मार्च-2019 मध्ये या गृहप्रकल्पाचे काम सुरू झाले होते. प्रकल्पात प्रत्येकी 11 मजल्याच्या एकूण 45 इमारती उभारण्यात येणार आहेत.

ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेचे सर्व हप्ते अदा केले आहेत, अशा लाभार्थ्यांसमवेत आर्टीकल ऑफ अॅग्रीमेंट दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना 6 जून पासून ताबे देण्यास  सुरुवात झाली आहे. यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पोर्टलवर 6 ते 19 जून पर्यंतचा ताब्याचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार इमारतनिहाय ताबा देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (PMRDA)  EWS सदनिकांसाठी 8 पथके आणि LIG सदनिकांसाठी 2 पथके तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये 3 कर्मचारी असून सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत 1 ते 6 मजल्यावरील आणि दुपारी 2.00 ते सायं. 5.00 या कालावधीत 7 ते 11 मजल्यावरील सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे.

​ताबा घेतेवेळी लाभार्थ्यांनी सदनिकेचे अंतिम वाटपपत्र व आधारकार्डची मूळ प्रत इ. कागदपत्रे सोबत घेऊन येणेचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ताबा हा सदनिकेच्या मूळ अर्जदारास देण्यात येणार आहे. मूळ अर्जदार हा सदनिकेचा ताबा घेण्यास काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यास सह अर्जदार यांच्या नावाने नोंदणीकृत Power of Attorney करुन दिली असल्यास सह अर्जदारास सदनिकेचा ताबा देता येईल.

 

​सुधारीत वेळापत्रकानुसार लाभार्थी हे सदनिकेचा ताबा घेण्यास हजर न राहील्यास अशा लाभार्थ्यांना 19 जून नंतर ताबा देण्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करणेत येईल. पहिल्या दिवशी EWS गटातील 182 आणि LIG गटातील 52 अशा एकूण 234 सदनिकांचे ताबे देण्याची प्रक्रीया सुरळीतपणे पार पडल्याची माहिती सह आयुक्त बन्सी गवळी यांनी दिली.

 

Mahalunge : महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पकडला दहा किलो गांजा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.