Pune: कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागण्याची शक्यता- विजय वडेट्टीवार

Possibility of having to take loans for state employees' salaries says minister Vijay Vadettiwar सारथी संस्था बंद पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या संस्थेसाठी यंदाही 50 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील महसुलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कर्ज काढावे लागणार असल्याची भीती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ते बोलत होते.

मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे. पण, डॉक्टर, नर्स व त्यांच्याशी निगडीत असलेल्या करोना योद्ध्यांचे पगार दिले जाणार आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.

कोरोनामुळे राज्यातील उद्योग व्यवसाय चालणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील एक पैसाही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राने राज्याला लवकरात लवकर मदत देणे गरजेचे आहे. मदतीऐवजी राज्य सरकारवर टीका करण्याचे काम विरोधक करीत आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. या महाराष्ट्रद्रोहींना राज्य शासनाच्या कारभारावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

तर, सारथी संस्था बंद पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या संस्थेसाठी यंदाही 50 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. सारथीचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like