Pimpri news: ‘वायसीएमएच’मध्ये पोस्ट कोविड तपासणी सेंटर 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आजपर्यंत कोरोनाची लागण होऊन जे बरे झाले आहेत. त्यांना काही त्रास होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी वायसीएमएच’मध्ये पोस्ट कोविड तपासणी सेंटर सुरू केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

शहरात आजपर्यंत 87 हजार 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 83 हजार 374 जण बरे होऊन घरी गेले आहेत.  कोरोनातून बरे होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होत आहे का, त्यांची काय तक्रारी आहेत. यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात
पोस्ट कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. परिचारीकांना त्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 8 ते 10 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. शहरातील मृत्युदर 1.5 टक्क्यांच्या आसपास आहे.

लक्षणे विरहित रुग्णांसाठी चालू केलेल्या 19 पैकी 16 कोविड सेंटर बंद केले आहेत. आता केवळ तीनच सेंटर चालू आहेत. तिथे रुग्ण असल्याने ती चालू ठेवली आहेत. 1 नोव्हेंबर रोजी तेथील रुग्ण वायसीएम रुग्णालयात शिफ्ट केले जातील. त्यांनतर ते सेंटर देखील बंद करणार असल्याचे  हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.