पोस्ट कार्यालय बंदमुळे नागरिकांची गैरसोय 

0
एमपीसी  न्यूज :  तळेगाव दाभाडे (गावभाग)  व तळेगाव स्टेशनचे पोस्ट कार्यालयाचे कामकाज एकत्रितपणे शाळा चौकातील अत्यंत अपु-या जागेत सुरू आहे. तळेगाव स्टेशन विभागात काम करणा-या एका कर्मचा-याला कोरोनाचे संक्रमण झाल्याने खबरदारी म्हणून पोस्ट कार्याल दोन दिवसापासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. 
एकत्रित असलेले तळेगाव दाभाडे व तळेगाव स्टेशनचे पोस्ट ऑफिस दोन पासून  बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक ,पोस्टमध्ये आर्थिक व इतर व्यवहार करणारे खातेदार नाराज झाले असून तळेगाव स्टेशनचे पोस्ट ऑफिस लवकरात लवकर विभक्त करून ते तळेगाव स्टेशनच्या भागांमध्ये त्वरित घ्यावे. अशी मागणी तळेगाव स्टेशनच्या खातेदाराकडून होत आहे.
सध्या तळेगाव दाभाडे (गावभाग) व तळेगाव स्टेशनचे पोस्ट ऑफिस एकत्र तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकामध्ये अपुऱ्या जागेमध्ये एकत्र काम करत आहेत. तळेगाव स्टेशन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाचे संक्रमण झाल्याने त्याची लागण होऊ नये म्हणून दोन्ही ही पोस्ट ऑफिस बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये होणारे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून या कामामध्ये जेष्ठ नागरिक यांना आपल्या ठेवीवरील व्याज घेणे, आपल्या बचत खात्यातून सणासुधीसाठी रक्कम काढणे, तसेच रजिस्टरच्या माध्यमातून बुकिंग करणं, स्पीड पोस्ट करणे इत्यादी काम होत असतात ही सर्व काम ठप्प झाली आहेत.
तळेगाव दाभाडे व तळेगाव स्टेशन पोस्ट ऑफिस मध्ये कोरोना विषाणू संक्रमित कर्मचारी आढळल्यामुळे दिनांक 16 पासून ही ऑफिस बंद ठेवण्यात आली असून सोमवार दिनांक 19 पासून ती कार्यान्वित होईल. तोपर्यंत पोस्टाचे सर्व अत्यावश्यक व्यवहार संबंधित खातेदारांनी इतर ठिकाणच्या पोस्ट ऑफिस मधून करावेत. असे आवाहन  तळेगाव दाभाडे पोस्ट ऑफिसच्या  उप डाकपाल मनीषा गावंडे यांनी केले.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.