Poster Release Of Adipurush: आदिपुरुषचे पोस्टर रिलिज- चांगल्याची वाईटावर मात

Poster Release Of Adipurush- Good Overcomes Evil 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटानंतर ओम राऊत पुन्हा एका ऐतिहासिक चित्रपटाकडे वळले आहेत.

एमपीसी न्यूज – अभिनेता अजय देवगण निर्मित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर या चित्रपटाने इतिहास घडवला. मराठी मातीतल्या वीरांची यशोगाथा या चित्रपटामुळे रसिकांसमोर आली. त्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत याने केले होते. आता ओम राऊत बाहुबली प्रभासच्या साथीने आणखी एका प्रकल्पावर काम करत आहे.

ते दोघेही एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मंगळवारी सकाळी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास या चित्रपटाचं मोशन पोस्टरदेखील रिलीज करण्यात आलं.

‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटानंतर ओम राऊत पुन्हा एका ऐतिहासिक चित्रपटाकडे वळले आहेत. ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरुन या चित्रपटातून प्रभू श्री रामचंद्र यांच्या जीवनावर भाष्य करण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे.

या पोस्टरमध्ये Celebrating Victory of Good over Evil असं लिहिण्यात आलं आहे. याचाच अर्थ चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींवर मात करतात. तसंच या पोस्टरमध्ये श्रीरामांचे धनुष्यबाण दिसत आहे. तर दुसरीकडे हनुमान आणि रावणही दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रभू श्रीरामचंद्र यांच्यावर आधारित असल्याचं बोललं जातं आहे.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट 3D अ‍ॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा आहे. भूषण कुमार यांनी याची निर्मिती केली आहे. 2022 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.