Pune : रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवा ; आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज : गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे यापूर्वी बुजविण्यात आले असले, तरी त्यांची पुन्हा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी सूचना पथ विभागाने महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांना केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असून, त्यासाठी आवश्यक मालाचा पुरवठा करण्याचे आदेशही दिले आहेत.

महापालिकेने गेल्या महिनाभरात पावसात खड्डे बुजविण्याची कामे केली आहेत. मात्र, हे खड्डे बुजविले गेले असले, तरी पुन्हा त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता भासते आहे. शहरातील 12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावरील खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. शहराच्या अंतर्गत असणा-या रस्त्यांवरील खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, नगरसेवकांकडून या रस्त्यांबाबत तक्रारी आहेत. हे कमी रुंदीचे रस्ते तयार करणे, त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारीही क्षेत्रीय कार्यालयांची आहे. या पार्श्वभूमीवर पथ विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पत्र पाठवून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची सूचना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.