Chikhali: पोल्ट्री व्यावसायिक महिलेची 15 लाखांची फसवणूक

Poultry business woman deceives of Rs 15 lakh in chikhali आरोपी हे गब्बर अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आणि भागीदार आहेत. फिर्यादी थिटे या शेती आणि पोल्ट्री व्यवसाय करतात.

एमपीसी न्यूज- कोंबड्यांची पिल्ले, त्यांचे खाद्य औषधे पुरवून पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची खरेदी करण्याचे आमिष दाखवून पोल्ट्री व्यावसायिक महिलेकडून लाखो रुपये घेतले. तसेच घेतलेले पैसे परत न करता, खाद्य आणि औषधांचेही पैसे न देता पोल्ट्री व्यावसायिक महिलेची एकूण 15 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृगेश जयवंत कदम (रा. वडगाव शेरी, पुणे), सुधीर सुभाष कापरे (रा. धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोल्ट्री व्यावसायिक महिला सोनल रवींद्र थिटे (वय 29, रा. रामदास नगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे गब्बर अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आणि भागीदार आहेत. फिर्यादी थिटे या शेती आणि पोल्ट्री व्यवसाय करतात.

आरोपींनी फिर्यादीच्या पोल्ट्रीसाठी पाच हजार पिल्ले पुरविण्याचे मान्य केले. पिल्लांना लागणारे खाद्य व औषधे गब्बर अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे पुरवली जाणार.

तसेच पिल्ले 80 ते 100 दिवसांची झाल्यानंतर पिल्लांची खरेदी देखील गब्बर अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करणार असा करार करण्यात आला.

आरोपींनी वारंवार फोन करून फिर्यादीकडे आगाऊ अनामत रकमेची मागणी केली. त्यासाठी फिर्यादीने साधना सहकारी बँक लिमिटेड, चिंचवड शाखा येथून सात लाख रुपयांचे कर्ज काढले आणि ते आरोपींना गब्बर अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने चेकद्वारे दिले.

आगाऊ रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी खोटी आश्वासने देऊन फिर्यादीशी बोलणे टाळले. फिर्यादीला गब्बर अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 15 लाख रुपये येणे असताना आरोपींनी फिर्यादीला 12 लाख रुपयांचा धनादेश दिला. तो धनादेश फिर्यादीने साधना सहकारी बँक लिमिटेड या बँकेत भरला असता तो धनादेश वटला नाही.

याबाबत गब्बर अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि भागीदार आरोपी यांनी फिर्यादीची 15 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.