Maval News : पोल्ट्री कंपन्यांनी पोल्ट्री फार्मरला संवर्धन मूल्य वाढवून द्यावे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पोल्ट्री कंपन्यांनी फार्मरला संवर्धन मूल्य (ग्रोव्हिंग चार्ज) वाढवून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील सर्व पोल्ट्री व्यवसाय करणा-या कंपन्यांच्या व्यवस्थापकांना मावळ तालुका पोल्ट्री संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. 24) देण्यात आले.

मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी, उद्योजक एकनाथ गाडे, प्रविण शिंदे, महेश कुडले, विनायक बधाले, शिवाजी कारके, श्रीराम सुतार, राजू ठाकर आदी पदाधिकारी यांनी तळेगाव, वडगाव,कामशेत, जांभूळ येथील पोल्ट्री कंपन्यांच्या मॅनेजरांना निवेदने देऊन चर्चा केली.

पोल्ट्री व्यावसायिकांना सद्यस्थितीत अतिशय अल्प ” संवर्धन मूल्य ” कंपन्यांकडून देण्यात येते. ते मूल्य वाढवून देण्यात यावे तसेच पक्षी उचलण्याच्या वेळेची भराई रक्कम वाढवून द्यावी असे प्रामुख्याने निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. पोल्ट्री फार्मरच्या अडचणी आणि मागण्यांबाबत तालुका पातळीवर लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संघटक गोपाळे गुरूजी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.