Vadgaon Maval News : ‘बर्ड फ्ल्यू’ च्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यावसायिक संघटनेची ‘ विशेष सभा ‘

एमपीसी न्यूज : मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेची ‘ विशेष सभा ‘ रविवार (दि 31) रोजी दुपारी 1 वाजता आंबी येथील शिवसोनाई मंगल कार्यालयात होणार आहे. 

बर्ड फ्ल्यू ‘ च्या पार्श्वभूमीवर या सभेत विशेष चर्चा होणार आहे. या सभेला मावळ अॅग्रोचे संस्थापक, सहकार महर्षी ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

तालुक्यातील सर्व पोल्ट्री धारकांना या सभेस उपस्थित राहाण्याचे आवाहन पोल्ट्री व्यावसायिक संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.