Pune : ‘गल्ली ते दिल्ली ‘ सत्ता असतानाही भाजप महापालिकेत हतबल

एमपीसी न्यूज  –  ‘गल्ली ते दिल्ली’ सत्तेचा नारा देत सत्तेत आलेले भाजपचे 98 नगरसेसवक महापालिकेतील सव्वा वर्षांच्या काळात ‘हतबल’ ठरले आहेत. अगदी गल्लीबोळातील कामांपासून त्यांना ‘अपेक्षित’ कामे होत नाहीत, असा तीव्र आक्षेप घेत या माननीयांनी प्रशासनाचा निषेध करून आपली हतबलता व्यक्त केली आहे.

निमित्त होते महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर काँग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फोर्मशन मध्ये बसेस खरेदी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कसे जाहीर करतात. हा महापौर आणि सभागृहाचा अवमान आहे, असा आरोप करत खुलासा करण्याची मागणी करत चर्चा सुरू केली. यानंतर मात्र सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी एलईडी, वाहतुक, खड्डे, पाणी पुरवठा अशा विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरायला सुरुवात केली. अधिकारी पत्रांना उत्तर देत नाहीत, कामे करत नाहीत , रस्त्यात बसेस बंदचे प्रमाण वाढत आहे, असे एकामागून एक प्रश्न जोरकसपणे मांडयाला सुरुवात केली. यापुढे जाऊन भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक बापुसाहेब कर्णे गुरुजी यांनी तर गेली ११ दिवस झाले लोहगाव परिसरात पाणी पुरवठा होत नाही, असा आरोप करत प्रशासनाचा निषेध केला.

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही ही संधी साधत कामे होत नसल्याबद्दल तीव्र नाराजीला वाट करून दिली. परंतु ही नाराजी व्यक्त करताना हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आणि सत्ता काळात चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांवर आणलेल्या दाबावाचा परिपाक असल्याचे नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस च्या काही पदाधिकाऱ्यांनी तर आमच्या सत्ता काळात तर अशी पद्धत नव्हती. प्रशासन आमची कामं करत होते, अशा डागण्याही सत्ताधाऱ्यांना दिल्या. यामुळे सत्ताधाऱ्यां मध्ये चुळबुळ सुरू झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.