Pimple Gurav News : समाजाला योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य वारकरी सांप्रदायात : डॉ. रामकृष्णदास लहवितकर

महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय भिसे

एमपीसीन्यूज : समाजाला योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य वारकरी सांप्रदायात आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायाच्या विचारांची जोपासना व्हायला हवी, असे प्रतिपादन महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी केले.

महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने पदाधिकारी नियुक्ती सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पिंपरीच्या महापौर माई ढोरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार लक्ष्मण जगताप, रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.

यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांची महामंडळाच्या प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच वैकुंठवासी संतवीर ह.भ.प. रामदास महाराज मनसुख यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पिंपळे गुरव येथील निळु फुले नाट्यगृहात हा सोहळा पार पडला.

संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप मधुकरमहाराज मोरे, पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, भंडारा डोंगर दशमी समिती अध्यक्ष बाळासाहेब काशीद, मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदारमहाराज देव, माजी आमदार दिगंबर भेगडे, लोणावळा मनशक्ती केंद्राचे मुख्य विश्वस्त प्रमोद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, विभागीय अध्यक्ष जीवन खानेकर, जिल्हा अध्यक्ष सतिशमहाराज काळजे, शहराध्यक्ष विजय जगताप, चंद्रकांतमहाराज वांजळे, जिल्हा युवकाध्यक्ष संतोषमहाराज पायगुडे, प्रसिद्धी प्रमुख संजय भिसे, किशोर पाटील, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका माधवी राजापुरे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक चंद्रकांतमहाराज वांजळे यांनी केले. जालिंदर काळोखे व संतोष पायगुडे यांनी सूत्रसंचालन, तर सतिशमहाराज काळजे यांनी आभार मानले.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

मार्गदर्शक : चंद्रकांतमहाराज वांजळे

प्रसिद्धी प्रमुख पिंपरी चिंचवड- संजय भिसे

पुणे जिल्हाध्यक्ष : सतिशमहाराज काळजे

उपाध्यक्ष : दत्तात्रयमहाराज फरांदे ( बारामती )

कार्याध्यक्ष : शामराव हुलावळे

उपाध्यक्ष : दिलिपमहाराज खेंगरे ( मावळ )

संगटक : ठकाजी रौंधळ ( खेड )

_MPC_DIR_MPU_II

सहसंघटक : चंद्रकांतमहाराज मारणे ( मुळशी )

संपर्कप्रमुख : दत्तात्रयमहाराज राऊत ( खेड )

युवा जिल्हाध्यक्ष ; संतोषमहाराज पायगुडे

उपाध्यक्ष : आकाशमहाराज कामठे ( पुरंदर )

मार्गदर्शक : निवृत्तीमहाराज बोरकर ( शास्त्री )

उपाध्यक्ष : राहूलमहाराज पारठे ( भोर )

कार्याध्यक्ष : शेखरमहाराज जांभुळकर

सदस्य : पांडूरंगमहाराज गोळे ( मुळशी )

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष : जीवनमामा खानेकर

सल्लागार : बाळकृष्णमहाराज रणपिसे ( वकील )

सहसचिव : सखाराममहाराज नखाते

तीर्थक्षेत्र आळंदी अध्यक्ष : विठ्ठलमहाराज धोंडे

देहू : शिवाजीमहाराज वाघ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.