_MPC_DIR_MPU_III

Pune : गतविजेते महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख व अभिजीत कटकेची दमदार सुरुवात

माती विभागात ६१ किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याच्या सागर मारकडची सुवर्ण कामगिरी; महाराष्ट्र केसरी किताबच्या प्राथमिक फेरीत पुण्याचा अभिजीत कटके ६ सेकंदात चीतपट विजयी,

एमपीसी न्यूज – ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दुसरा दिवस गाजला तो ६१ किलो वजनात माती विभागात पुणे जिल्हयाच्या सागर मारकड व पुणे शहराचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या निखिल कदम यांमध्ये झालेल्या अंतिम लढतीने. या गटाच्या अंतिम फेरीत मारकड कुस्ती केंद्र, इंदापूरच्या सागर मारकडने निखिल कदमवर ४० सेकंदात चितपटीने विजय मिळवित सुवर्णपदक पटकाविले.    

_MPC_DIR_MPU_IV

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची शनिवारच्या संध्याकाळच्या सत्रात ६१ किलो माती विभागातील लढतीबरोबरच आज महाराष्ट्र केसरी खुल्या गटाची प्रथम फेरी देखील पार पडली.

आज ६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्ह्याच्या सागर मारकडने औरंगाबादच्या सौरभ राऊत उपांत्य फेरीत चितपट विजय मिळवित अंतिम फेरीत धडक मारली तर पुणे शहराच्या निखिल कदमने सोलापूरच्या हणूमंत शिंदेवर २-१ ने मात करीत अंतिम फेरीतीळ आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर सागर मारकड व निखिल कदम यांच्यात झालेल्या लढतीत सागर मारकड सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. याबरोबरच कांस्य पदकासाठी हणूमंत शिंदे (सोलापूर जिल्हा ) व सौरभ राऊत (औरंगाबाद शहर) यांमध्ये लढत झाली व हनुमंत शिंदे १२-३ ने विजेते ठरले.

विशेष म्हणजे सागर मारकड प्रथमच ६१ किलो वजनी गटात खेळत होता व पदार्पणातच त्याने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. या आधी सागर ५७ किलो वजनी गटात खेळत असे. त्याही गटात गेली ४ वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. याविषयी बोलताना सागर म्हणाला की, नवीन वजनी गटात खेळण्यासाठी गेले वर्षभर तयारी करीत होतो. त्यामुळे आपण यामध्ये पदक जिंकू असा विश्वास होता पण अंतिम फेरीत इतक्या सहजासहजी विजय मिळेल असे वाटले नव्हते. यशाचे श्रेय मी माझे वडील मारुती मारकड यांना देतो, जे स्वत: एनआयएस कुस्ती प्रशिक्षक आहेत. यापुढे राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याचे माझे ध्येय असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर लक्ष केंद्रीत करेल. असे सागरने सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

वेळी पिंपरी चिंचवड पोलिस दलाच्या सहआयुक्त स्मिता पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पदके प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे सुनील तरटे, कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष गणेश कोहळे , परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे आदि उपस्थित होते.

याबरोबरच महाराष्ट्र केसरी खुल्या गटाची प्रथम फेरी देखील पार पडली. यामध्ये गादी विभागाच्या विशेष लक्षवेधी लढतींमध्ये लातूरच्या सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिले वर १९ सेकंदात १० गुणांच्या तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळविला. तर पुण्याच्या अभिजीत कटके याने अमरावतीच्या मिरजा नदीम बेग याच्यावर ६ सेकंदात चीतपट विजय मिळवून पुढच्या फेर्‍यांमध्ये सहज प्रवेश केला आहे. याबरोबरच मुंबईच्या समाधान पाटील याने हिंगोलीच्या दादुमिया मिलानी वर ७ विरुद्ध २ या गुण फरकाने विजय मिळविला. सोलापूर शहरच्या योगेश पवारने ठाणे जिल्ह्याच्या साहिल पाटीवर ११ विरुद्ध ६ या गुण फरकाने विजय मिळविला. विष्णु खोसे यांचा प्रतिस्पर्धी काही कारणास्तव अनुपस्थित असल्याने त्याला पुढे चाल मिळाली.

तर माती विभागात गत विजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेखने अमरावतीच्या हर्षल आकोटकरवर १०-० असा तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळविला. तसेच वाशिमच्या सिकंदर शेखने तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळविला. तर संकेत घाडगे (पिंपरी चिंचवड), सागर मोहलकर (अहमदनगर), संतोष लवाटे (कोल्हापूर जिल्हा), उमेश सिरतोडे (वर्धा), शुभम जाधव (यवतमाळ), व तृणाल वाट यांनी पुढील फेरीत प्रवेश मिळविला.

६१ किलो माती विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – सागर मारकड (पुणे जिल्हा)
रौप्य – निखिल कदम (पुणे शहर)
कांस्य- हणूमंत शिंदे (सोलापूर जिल्हा)

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.