Pimpri : प.पू.108 पुलकसागरजी महाराज यांचा विविध धार्मिक कार्यक्रमाने मंगल प्रवेश

एमपीसी न्यूज – प. पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचा निगडी येथील जैन मंदिरात आज रविवारी (दि. 9) विविध धार्मिक कार्यक्रमाने मंगल प्रवेश झाला. शहरात विविध ठिकाणी त्यांची उत्साहात पाद्यपूजा करण्यात आली. 

निगडी येथील जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी साडेसात वाजता प्राधिकरण येथून मिरवणुकीला सुरुवात झाली.  ही मिरवणूक संभाजी चौक, भेळ चौक, शांतीसागर चौक मार्गे स्पाईन रस्त्याने मिरवणूक भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे पोहोचली. यावेळी सकल समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, जान्हवी धारीवाल (आरएमडी अध्यक्षा) मिलिंद फंडे (उपाध्यक्ष), अजित पाटील (उपाध्यक्ष), अरविंद जैन, चकोर गांधी, सुरेंद्र गांधी, विरेंद्र जैन, जितेंद्र शहा, सुदीन खोत, संजय नाईक, विजय भिलवडे, अभय कोठारी, जितेंद्र शहा, सुजाता शहा, प्रकाश कटारिया, मोतीलाल चोरडिया, वीरकुमार शहा, प्रकाश शेडबाळे, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, नगरसेविका शर्मिला बाबर आदी उपस्थित होते.

या मिरवणुकीचे खास आकर्षण रथ, ढोलपथक, राजस्थानी संगीत मंडळ, लोकप्रतिनिधी, कलश घेतलेल्या महिला मंडळ व अनेक जैन श्रावक यांचा समावेश होता. मंदिरामध्ये महाराजांचे पाद्यपूजा झाली. त्यानंतर भगवंताचा अभिषेक झाला. दि. 14 ते 24 सप्टेंबर या कालावधीत पुलकसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात पर्युषणपर्वाचे महत्व याविषयावर व्याख्यान झाले. यावेळी प.पू. 108 पुलकसागरजी महाराज यांनी दान या विषयावर व्याख्यान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.