BNR-HDR-TOP-Mobile

Pradikaran : धोकादायक असणारा महावितरणचा ट्रान्सफॉर्मर त्वरीत हलविण्याची मागणी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणात रहदारीचे प्रमाण आहे. या रहदारीच्या ठिकाणी महावितरणचा ट्रान्सफार्मर आहे. यामुळे मागील काळात सेक्टर क्रमांक २६ येथे छोट्या छोट्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत, तरी जनतेच्या सुरक्षेच्याबाबतीत गंभीर आहे. पावसाळा सुरु होण्याआधी धोकादायक ट्रान्सफॉर्मर त्वरीत हलवाला, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या सोशल मिडियाप्रमुख कोमल काळभोर यांनी भोसरी मुख्य अभियंता राहूल गवारे यांच्याकडे लेखी निदेनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, सेक्टर क्रमांक २६ प्राधिकरण येथील महावितरणचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक आहे. या धोकादायक ट्रान्सफॉर्मरमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडच आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबतीत महावितरण अधिका-यांना वारंवार तक्रार केली. पण, योग्य ती दखल घेतली नाही. हा धोकादायक ट्रान्सफार्मर त्वरीत हलवावा.

  • यासाठी नागरिकांनी भाजप महिला मोर्चा प्रमुख आणि मिडिया सेल अध्यक्षा कोमल काळभोर यांच्याकडे धाव घेऊन मागणी केली. याबाबतीत त्वरीत दखल घेऊन डिव्हिजन अभियंता कवडे आणि भोसरी मुख्य अभियंता राहूल गवारे यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन निवेदन दिले.

याबाबतीत महावितरणकडून दोन ते तीन दिवसांत जागेची पाहणी करुन तसेच योग्य जागा पाहून लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महावितरणने दिले.

HB_POST_END_FTR-A2

.