BNR-HDR-TOP-Mobile

Pradikaran : ज्येष्ठ नागरिकांकडून पूरग्रस्तांना 91 हजार रुपयांची मदत

एमपीसी न्यूज – नगरसेवक अमित गावडे यांच्या समन्वयातून प्राधिकरण परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक एकत्र आले. दुर्गेश्वर मित्र मंडळ, समर्थ युवा प्रतिष्ठान व प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अप्पर तहसीलदार कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 91 हजार रुपयांचा धनादेश अधिकारी गणेश सोमवंशी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

यावेळी नगरसेवक अमित गावडे म्हणाले की ,’प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमात परिसरातील नऊ संघ सहभागी झाले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत जेष्ठांनी आपल्या पुंजीतून मदतनिधी उभा केला. हीच प्रेरणा घेऊन आमच्या मंडळांनी त्यात सहभाग दिला. पिडीतांना मदत करणे ही आपली संस्कृती आहे.

यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी, साहित्यिक राजेंद्र घावटे, बाळकृष्ण हिंगे, डॉ. दिगंबर इंगोले, ज्योती इंगोले, खुळे काका, डॉ. गुणवंत चिखलीकर, चंद्रशेखर जोशी, प्रा. पी. बी. शिंदे, आनंदराव मुळूक आदी उपस्थित होते. सुमारे दीडशे जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मदतनिधी सुपूर्त करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3