Pradikran : भेंडवडे, हातकणंगले, कोल्हापूर येथे निगडी ज्ञान प्रबोधिनीचे आपत्ती निवारणाचे काम सुरु

एमपीसी न्यूज – ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे शिक्षक, पालक आणि परिसरातील मित्र परिवार गट यांचेतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत कार्य सुरु झाले आहे.  भेंडवडे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे निगडी ज्ञान प्रबोधिनीचे आपत्ती निवारण काम सुरु केले आहे.

काल डुंबरे, सादूल आणि युवक हृषीकेश मापारी, अनुज देशपांडे यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहाणी केली. गावची लोकसंख्या सुमारे ७००० घरं १२०० पैकी सुमारे ५०० घरं पूरबाधित आहेत, ४० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. गाव शहरापासून २५ दूर हायवेपासून ६ कि.मी. पूर्वेकडे आहे. पाणी ओसरायला लागले आहे. तेव्हा लोकांना घरं स्वच्छ करून देणे, रस्त्यावरील राडारोडा साफ करणे, अशी प्राथमिक कामे १३ ऑगस्टपासून सुरु करीत आहोत.

  • या कामात श्रमदानासाठी सहभागासाठी सर्वांना आवाहन ! पुढील लिंकव्दारे आपली नावनोंदणी करू शकता. https://forms.gle/eY4Gj2hj2HECUx8r9 आपण या गावाचे संपूर्ण पुनर्वसन होईपर्यंत किमान एक महिना या गावांत काम करणार आहोत. या कामासाठी आर्थिक मदतीचीही आवश्यकता आहे. यासाठी पुढील शाळेच्या अकाउंटवर देणगी देऊ शकता. त्यासाठी आपणांस 80 G पावती मिळू शकेल. यासाठी (पूर)आपत्ती निवारण समिती, ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र.पालक महासंघ,मित्र परिवार, प्राधिकरण येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

मदतीसाठी आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे :
Name of Beneficiary : Jnana Prabodhini Navanagar Vidyalaya , Nigdi
Name of Bank : The Cosmos Co-Operative Bank Ltd
Name of Branch : Nigdi Branch ,Pune 44
Account No. : 902204201930001
IFSC : COSB0000902

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.