Prague: टॉम अ‍ॅन्ड जेरी,पॉपियेचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन

एमपीसी न्यूज – ऑस्कर पुरस्कार विजेते रेखाचित्रकार आणि टॉम अ‍ॅन्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच (95)  यांचे नुकतेच निधन झाले.  चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात 16 एप्रिलला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1924 रोजी शिकागोत झाला, त्यांचे पूर्ण नाव युजीन मेरिल डाइच असे होते. 

जीन हे अधी उत्तर अमेरिकेच्या लष्करात होते. ते वैमानिकांना प्रशिक्षण व लष्करासाठी ड्राफ्टसमनचे काम करत होते. परंतु आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना 1944 मध्ये लष्करातून काढून टाकण्यात आले. नंतर ते अॅनिमेशन जगतात आले. जीन डाइच यांनी काही लोकप्रिय अ‍ॅनिमेशन पटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामध्ये पॉपिये द सेलर मॅन, मुन्रो, टॉम टेरिफिक अँड नुडनिक यांचा समावेश आहे. त्यांनी टॉम अँड जेरीच्या 13 भागांचे दिग्दर्शन केले. ‘पॉपिये द सेलर’ मालिकेतील अनेक भाग त्यांनी दिग्दर्शित केले होते. 1959 मध्ये ते प्राग येथे दहा दिवसांच्या दौऱ्यावर आले असता झडेन्का हिच्या प्रेमात पडले, तिच्याशी विवाह करून ते प्राग येथे स्थायिक झाले.

डाइच यांना 1960 मध्ये मुन्रोच्या रूपाने उत्कृष्ट लघु अ‍ॅनिमेशनपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याच प्रवर्गात त्यांना 1964 मध्ये ‘हिअर इज नुडिक’ व ‘हाउ टू अ‍ॅव्हॉइड फ्रेंडशिप’ या अ‍ॅनिमेशनपटांसाठी नामांकन मिळाले होते. ‘सिडनीज फॅमिली ट्री’ या मालिकेचे ते सह निर्माते होते त्यासाठी त्यांना 1958 मध्ये ऑस्कर नामांकन मिळाले होते. टॉम अँड जेरी या व्यक्तिरेखा बद्दल सांगताना डाइच एकदा म्हणाले होते की या दोन व्यक्तिरेखा माझ्या स्वप्नातही मला भांडताना दिसतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.