Adv. Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालय ( जुने ) येथे आज (सोमवारी) कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

या वेळी भोसरी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे. राज्यात लॉकडाऊन असल्याने कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन तोडून शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले होते. कार्यकर्त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या परिसरातच विविध उपक्रमांद्वारे त्यांचा वाढदिवस साजरा केला.

आज ॲड. आंबेडकर यांनी पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात जाऊन कोरोनाची को-वॅक्सिन लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.