Prakash Ambedkar on Maratha Arakshan : मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील : ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज : मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असून अशा लोकांचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

तसेच राज्यातील मागासवर्गीय अधिकाऱ्यांची आरक्षणांतर्गत किती पदे भरण्यात आले असून किती पदे रिक्त आहेत. शिवाय किती मागासवर्गीय अधिकाऱ्यांना आरक्षणाच्या आधारे प्रमोशन दिले आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे. मात्र ही माहिती उपलब्ध असूनही महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात द्यायला तयार नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

निवडणुकीसंदर्भात ते सध्या बिहारच्या पाटना शहरात आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला.

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने एका समितीचे गठन केले असून ही समिती मागासवर्गीयांच्या आरक्षण संदर्भात माहिती घेणार आहे. हा सर्व प्रकार फसवा असून मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये यासाठी काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राज्यातील सर्व मागासवर्गीय अधिकारी जे सध्या प्रमोशनच्या यादी मध्ये आहेत, त्या सर्वांनी विनंती आपण आपल्या कुटुंबासह सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन उभे करा, असे आवाहनही आंबेडकर यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.