Pune: उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका, प्रकाश आंबेडकर यांची टीका

Prakash Ambedkar slams on CM Uddhav Thackeray for lockdown देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे तरच माणसे जगतील. अन्यथा उपासमारीने मरतील, अशी आजची परिस्थिती आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करा, तरच माणसे जगातील. अन्यथा उपासमारीने मरतील. उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका, अशा खरमरीत शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणणार असल्याचे म्हटले होते. त्यावर आंबेडकर यांनी टीका केली आहे. भारतात 40 टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील, असे अमेरिकेच्या हाफकिन संस्थेने सांगितले होते.

मात्र, एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी भारतात कोरोना फैलावणार नसल्याचे सांगितले. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरले असल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

बुद्धाने एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे तरच माणसे जगतील. अन्यथा उपासमारीने मरतील, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवू नका, अशी विंनतीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट राज्यात वाढतच आहे. सतत लॉकडाऊन केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. कोरोनापेक्षा उपासमारीने लोक वैतागले आहेत. सातत्याने लॉकडाऊन केल्याने कोरोना काही कमी होत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.