Chinchwad News: प्रकाश गावडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Prakash Gawade dies of Heart attack.

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांडुरंग गावडे  (वय 62) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, नातू, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

प्रकाश गावडे यांचा चिंचवड स्टेशन येथे गावडे सायकल मार्ट या नावाने सायकलचा व्यवसाय होता. सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर होते. शांत, मनमिळावू, संयमी अशी त्यांची ओळख होती.

_MPC_DIR_MPU_II

ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय, निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बांधकाम व्यावसायिक विलास गावडे, वीट कारखानदार दिलीप गावडे,  विजय गावडे यांचे बंधू तर शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांचे चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.