Pramod Salunke: मुप्टाच्या उच्च माध्यमिक अध्यक्ष पदी प्रा.प्रमोद साळुंके

एमपीसी न्यूज : शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेली 25 वर्षांपासुन आक्रमकपणे लढा देणा-या महाराष्ट्र राज्य स्तरावरील शिक्षक संघटनेच्या उच्च माध्यमिक पुणे शहर अध्यक्ष पदी प्रा.प्रमोद साळुंके यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.(Pramod Salunke) ही निवड संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राचार्य सतिश वाघमारे यांनी नियुक्तपञ देऊन निवड घोषित केली.

 

 

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राचार्य सतिश वाघमारे,प्राचार्य हनुमंत चव्हाण, पश्चिम महाराष्ट सचिव सय्यद मुस्तफा, पुणे ग्रामिण जिल्हाअध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे,डॉ.शिरीष मोरे,डॉ.प्रदीप पाटील,क्रीडा अधिकारी पुणे शहर भूषण बहिरमे,प्रा.शब्बीर इनामदार,वाई तालुकाअध्यक्ष प्रा.धैर्यशील पाटील,खंडाळा तालुका अध्यक्ष प्रा. महेंद्र गाढवे,प्रा .स्फुर्ती देशपांडे,प्रा.विनित निर्मळे,प्रा.जेजेरथ चंदनशिवे,प्रा.सत्यभामा बिराजदार,प्रा.विजया दिघे,प्रा.निलेश साबणे,प्रा.उमेश सरगर,प्रा.सचिन सुबाळकर,प्रा.विनोद महाजन,प्रा.नीता गायकवाड आदी उपस्थित होते.

 

Sujata Palande: भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश मीडिया प्रमुखपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती

 

महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टिचर्स असोसिएशन (मुप्टा)ही राज्यस्तरीय शिक्षक संघटनेने आताच नुकताच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले.(Pramod Salunke) शिक्षक व सर्व कर्मचारी यांच्या 20 टक्के अनुदानित,विनाअनुदानित,पेन्शन,अनुदान व भरती प्रक्रीया,वेतनाचे बाबतच्या समस्या व विविध स्तरावरील मान्यता,विविध अडीअडचींना प्रभावीपणे न्याय मिळून देण्यासाठी काम करण्यासाठी प्रा.प्रमोद साळुंके यांची उच्च माध्यमिक विभाग पुणे शहर या ठिकाणी काम करण्यासाठी संस्थेने निवड केलेली आहे. प्रा.प्रमोद साळूंके यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.