Nigdi : अ‍ॅथलॅटीक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत प्रणव सोरटेचे यश

एमपीसी  न्यूज – विविध क्रिडा स्पर्धेत सहभागी होणार्‍या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे आश्‍वासन कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांनी दिले.

_MPC_DIR_MPU_II

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ अ‍ॅथलॅटीक्स चॅम्पीयनशीप 2018 राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा दिनांक 22 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान संपन्न झाली त्यात प्रतिभा वाणिज्य व संगणक शास्त्र महाविद्यालयातील प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेला युवा खेळाडू प्रणव सोरटे याने 20 वर्षाखालील लांब उडी खेळात 6.59 मीटर उडी मारुन  रजत पदक पटकाविले.  या दैदीप्यमान यशाबद्दल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात दिपक शहा बोलत होते.  या वेळी महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, शारीरीक शिक्षण संचालक डॉ. आनंद लुंकड, व प्रा.पी.टी. इंगळे उपस्थित होते.

डॉ. दिपक शहा पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण घेत असताना क्रिडा स्पर्धात सहभाग घ्यावा.  खेळामुळे आरोग्य उत्तम रहाते.  विशेष चमक दाखविणार्‍या खेळाडूनी सातत्यपूर्ण सराव करुन विविध खेळात.  यश प्राप्त करुन आपल्या आईवडीलांच्या लौकिकात भर टाकावी संस्थेतर्फे जी काही मदत लागेल त्याची पूर्तता करण्याचे आश्‍वासन यावेळी दिले.
सध्या प्रणव सोरटे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीच्या क्रिडांगणावर प्रशिक्षक संपदा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.