Pimpri: प्रांत पोलीस मित्र संघातर्फे शहरातील पोलिसांना मोफत मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज –  संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रांत पोलीस मित्र संघाच्या वतीने मंगळवारी मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी प्रांत पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष गोपाळ बिरारी, महाराष्ट्र,प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष संपत बोराटे, पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर शिंदे, शांतता कमिटी प्रमुख सुभाष मालुसरे, डॉल्फिन अकॅडमीचे संस्थापक संदीप पोलकम, गणेश नवरे, पिंपरी चिंचवड सचिव राजेश बिराजदार, पिंपरी-चिंचवड प्रमुख दत्ता भोई आदी मान्यवरांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.