Prasad Patil : आयर्नमॅन प्रसाद पाटील यांच्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर – सचिन साठे

एमपीसी न्यूज : विशालनगर, पिंपळेनिलख येथील रहिवासी व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पदावर सेवेत असणारे प्रसाद पाटील यांनी कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत आयर्न मॅन हा किताब पटकावला.(Prasad Patil) प्रसाद पाटील यांनी वयाच्या 36 व्या वर्षी हा किताब दुसऱ्यांदा मिळवून पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे. अशा खेळाडूंचा महापालिकेने उचित सन्मान करावा अशी मागणी प्रशासक यांच्याकडे करणार आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी सांगितले.

सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रसाद पाटील यांचा बुधवारी (दि. 17) त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन साठे, काळूशेठ नांदगुडे, भुलेश्वर नांदगुडे, अनिल संचेती, अनंत कुंभार, अश्विन भुते, श्रीधर दाते आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसाद पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले की, नूर सुलतान (कझाकीस्थान) येथे  14 ॲागस्ट ला झालेल्या “IRONMAN triathlon” चे आव्हान मी 13 तास 15 मिनिटात पूर्ण केल्यामुळे मला “आयर्न मॅन” किताब देऊन गौरवण्यात आले. मागील वर्षी जर्मनी येथे 29 ऑगस्ट ला झालेल्या या स्पर्धेत मी 13 तास 27 मिनिटाची वेळ नोंदवून पहिल्यांदा हा किताब मिळवला होता.(Prasad Patil) आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी हि स्पर्धा आहे. त्यामुळे जगभर आयर्नमॅन स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. सलग 3.8 कि.मी. खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी 2000 इतर स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणा-या वा-या विरुद्ध सायकलिंग करणे व लगोलग 42.2 किमी धावणे ही आव्हाने सलगपणे पूर्ण करायची असतात.

Pune Police: पॅरॉलवर असणाऱ्या सराईताला दोन पिस्टल व काडतुसासह अटक

हे आव्हान 16 तासाच्या आत पूर्ण करणाऱ्यास “IRONMAN” हा किताब बहाल केला जातो. भारतातून इतर 180 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. मी हे आव्हान 13 तास 15 मिनिटात पूर्ण केले.(Prasad Patil) माझे प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ, ओमकार जोकार, स्वप्निल चिंचवडे, अश्वीन भूते यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मला हे शक्य झाले. मेहनत, जिद्द, सातत्य, कठोर परिश्रम या बळावर ही स्पर्धा पूर्ण केली. तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागात अशी स्पर्धा पूर्ण करणारा मी पहिला अधिकारी ठरलो आहे असेही प्रसाद पाटील यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.