Pratibha college : प्रतिभा महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबीर व स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयात (Pratibha college) राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना तसेच लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्लेषा देवळे, प्रा. सुक्लाक कुंभार, डॉ. जयश्री मुळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मयूर राजगुरव, माजी विभाग अध्यक्षा प्रमिला वाळुंज, ला. प्रकाश पटेल, डॉ. सचिन पवार, पुणे ब्लड बँकेचे डॉ. शिरीष पोफळेकर, डॉ. मयुरी लोखंडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ प्रभाग’ क्षेत्रिय आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख सचिन जवळकर, सहाय्यक आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र साबळे, ई.एस.आय. रुग्णालयाच्या भारती पाटील आदी उपस्थित होते.

Talegaon crime : ज्ञान सरस्वती प्रोड्यूसर कंपनीच्या MPO आणि संचालकावर गुन्हा दाखल करण्याची पदाधिकारी व सभासदांची मागणी

या शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले, रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन अनिकेत शिंदे, सोहेल शेख, संतोगी चित्रे, अभिषेक कोळी, कार्तिकी कोंडे, समर्थ हरीहर, श्रेयश शिंदे, मयुर निमके, मेघराज बागी, गणेश देशमुख आदी विद्यार्थ्यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी ‘कलयुगातील राक्षस’ पथनाट्याद्वारे, (Pratibha college) काळभोर नगर, मोहन नगर, ई.एस.आय. रुग्णालय परिसरात पथ नाट्याद्वारे नागरिकांत सुका कचरा, ओला कचरा, घातक कचरा याबाबत स्वच्छतेविषयी जनजागृती केली.

परिसरातही रस्ते, दुकान, घरे येथील प्लॉस्टिक पाण्याच्या बाटल्या, टाकाऊ कचरा एकत्रित करून त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्यात आली.(Pratibha college) या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. आश्लेषा देवळे, प्रा. रुक्लाल कुंभार, डॉ. जयश्री मुळे, प्रा. प्रिती कोल्हे आदींनी नियोजन केले. पथनाट्याचे संयोजन श्वेता वर्मा, अथर्व दिघे, अभिषेक कोळी, अनिकेत शिंदे आदींनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.