Pratibha institute : प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये हिंदी दिनानिमीत्त सप्ताह साजरा

एमपीसी न्यूज : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने हिंदी दिना निमीत्त विविध उपक्रमांतर्गत सप्ताह साजरा करण्यात आला.(Pratibha institute) हा सप्ताह 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला.

प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील प्राध्यापक, विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. बाळासाहेब सोनावणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया समवेत उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, डॉ. सुवर्णा गायकवाड, डॉ. जयश्री मुळे, डॉ. रुपा शहा, हिंदी विभागाचे संयोजक डॉ. रवींद्र निरगुडे, प्रा. सुशील भोंग उपस्थित होते.

PHD entrance : पीएच.डी प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

प्रमुख पाहुणे डॉ. बाबासाहेब सोनावणे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबर शुद्ध हिंदी भाषेचे अवगत केली पाहिजे.(Pratibha institute) संस्थेने सामुहिक हिंदी दिन सप्ताह स्वरुपात साजरा केला ही कौतुकास्पद बाब आहे. देशाच्या विकासासाठी हिंदी भाषा महत्वाची असून त्यासाठी जास्तीत जास्त हिंदी भाषेचा प्रसार करणे, ही काळाजी गरज आहे, असे मत व्यक्त केले.

यावेळी हिंदी दिनानिमित्त पोस्टर, लेखन, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तजनार्थ विजयी झालेले पोस्टर स्पर्धेत सुशील साहनी, स्वामीनी आवटे, व्ही. मधुवर्शीनी, जयश्री पुरोहित तर, लेखन स्पर्धेत वैष्णवी देसाई, रोशनी भारती, श्रुती भोसले, संजीवनी केचे (Pratibha institute) या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. यावेळी हिंदी कविता, गझल, शेर-शायरीचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजक डॉ. रविंद्र निरगुडे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याणी जोशी, रोशनी भारती, अर्जिता बोराटे यांनी तर, आभार डॉ. रूपा शहा यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.