Rotaract club of Talegaon Dabhade City: अध्यक्षपदी प्रतीक माने तर सचिवपदी वैभव तनपुरे

Pratik Mane took over the charge as President of Talegaon Dabhade City Rotaract Club ऑनलाईन पदग्रहण समारंभात स्वीकारली सूत्रे

एमपीसी न्यूज – रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचा चौथा पदग्रहण समारंभ रविवारी  (दि.12) पार पडला. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम डिजिटल माध्यमांचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. यावेळी रो. प्रतीक लक्ष्मण माने यांनी अध्यक्षपदाची तर रो. वैभव तनपुरे यांनी सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली.

या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी चे अध्यक्ष रो. संतोष शेळके, एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे सचिव रो. दीपक फल्ले उपस्थित होते.

डेप्युटी DRR, RID 3131रो. दृष्टी सिंग, DRRE, RID 3131 रो. आकाश चिकटे, यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना एमपीसी न्यूज चे संपादक विवेक इनामदार यांनी कोरोनाला घाबरून न जाता सतर्क राहून योग्य काळजी घेण्याचा  सल्ला दिला.

रोट्रक्टर्स यंदा सर्व उपक्रम डिजिटल पद्धतीने राबवणार आहे. तसेच सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे रोट्रक्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष रो. प्रतीक माने यांनी सांगितले.

 यावेळी रो. विलास काळोखे, रो. दिलीप पारेख, रो. मनोज ढमाले, रो. दादासाहेब उऱ्हे, रामभाऊ माने, लक्ष्मण माने, अनिता लक्ष्मण माने, रो. आकाश गाडे, रो. प्रतिक मेहता, रो. अजिंक्य कसाबी, रो. हर्षद जव्हेरी उपस्थित होते. रो. अक्षता सोनकांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रो. अथर्व कदम यांनी केले तर रो. रोशनी ओसवाल आणि रो. आकाश लांडे यांनी नियोजन केले. रो. आकाश गाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.