Vadgaon Maval : जुना वडगाव-कातवी साखळी रस्त्याला निधी मंजूर करा, प्रवीण ढोरे यांची मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव व कातवी येथील नागरीकरण वाढत आहे. वाढते नागरीकरण लक्षात घेता जुना वडगाव कातवी साखळी रस्ता होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रवीण ढोरे यांच्यासह कातवी ग्रामस्थ व तरूण युवकांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली आहे.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चव्हाण,अकुंश चव्हाण,मच्छिंद्र चव्हाण, कैलास चव्हाण अ‍ॅड दिपक चव्हाण,युवा नेते वैभव पिंपळे,किशोर चव्हाण,संतोष पिंपळे,अविनाश चव्हाण,विजय चव्हाण शैलेश चव्हाण,दत्तात्रय पिंपळे,स्वप्निल चव्हाण,अमोल चव्हाण,रामदास चव्हाण, रुपेश चव्हाण,मंगेश चव्हाण,रविंद्र चव्हाण,नंदु घुले,दिनेश चव्हाण, गणेश चव्हाण, अशिष चव्हाण, माऊली चव्हाण, तसेच असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या.

कातवी गावामधे आमदार सुनिल शेळके यांनी मंजुर केेलेली कामे व प्रस्तावीत कामांची पाहणी तसेच वडगाव नगरपंचायत हद्दीतील वडगांव कातवी साखळी रस्ता होणे अत्यंत गरजेचे व विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. कातवी व वडगाव येथील केशवनगर परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मुख्य मार्ग असल्याने कामगार, स्थानिक नागरिक, शेतकरी यांना सोयीस्कर होईल. तळेगाव व आंबी या मुख्य रस्त्यांना जोडला जाईल. त्यासाठी आवश्यक निधी आपणाकडून उपलब्ध व्हावा अशा आशयाचे निवेदन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष प्रविण ढोरे यांनी मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल अण्णा शेळके व नगराध्यक्ष मयुरजी ढोरे यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.