Maval News : कुसगाव पोलीस पाटील नियुक्तीबाबत प्रवीण दरेकर यांचे गृह राज्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक गावात 2019 पासून पोलीस पाटलाची नेमणूक झाली नाही, यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पोलीस पाटलाची लवकरात लवकर नेमणूक करावी याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांना पत्र पाठविले आहे.

कुसगावात 2018 साली झालेल्या पोलीस पाटील परिक्षेतील नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे दुय्यम पात्र असलेल्या किसन महादू गुंड यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. गावाला पोलीस पाटील नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दरेकर यांची भेट घेऊन, त्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेऊन दरेकर यांनी गृह राज्यमंत्री यांना पत्र पाठवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.